,

" बालसंस्कार " तर्फे सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा !

Monday, March 29, 2010 0 comments



तिथी

काही पंचांगांच्या मते हनुमानाची जन्मतिथी आश्विन वद्य चतुर्दशी आहे, तर काहींच्या मते चैत्र पौर्णिमा आहे. महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते.....

जन्माचा इतिहास......

उत्सव साजरा करण्याची पद्धत......

http://balsanskar.com/marathi/lekh/111.html

Read the full story

,

' बालसंस्कार ' तर्फे हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

Tuesday, March 16, 2010 0 comments

' बालसंस्कार ' तर्फे आपल्याला व आपल्या कुटुबियांना हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! या शुभदिनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बहुमोल असे मार्गदर्शन करणारे बालसंस्कार डॉट कॉम हे संकेतस्थळाचा श्री गणेशा करण्यात आला आहे.

' बालसंस्कार ' संकेतस्थळ कशासाठी ?
स्पर्धात्मक जीवनात तणावमुक्त राहण्यासाठी !
आपल्या पाल्याच्या यशस्वी जीवनासाठी !
मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी !
सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी !


अवश्य भेट द्या : www.balsanskar.com
 
Read the full story

छत्रपती शिवाजी महाराज

Tuesday, March 2, 2010 1 comments


छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा व कारकीर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता काही गोष्टी समोर येतात. शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा... असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेले दिसतात.

छत्रपती शिवाजी महाराजांनी


- बालपणी, तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वत: कष्ट घेतले,
- पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला,
- साध्या -भोळ्या मावळ्यांचे संघटन करून त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवाद जागृत केला,
- स्वत: शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वत:ला घट्टपणे बांधून घेतले;
- महत्त्वाचे गड-किल्ले जिंकले, नवे निर्माण केले,
- योग्य त्या वेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्या वेळी तह हे सूत्र कमालीच्या हुशारीने वापरून अनेक शत्रूंना नामोहरम केलेच, तसेच फितुरी, दगाबाजी, स्वराज्यांतर्गत कलहाचाही सामना केला,
- आक्रमणाच्या वेळी गनिमी कावा तंत्राचा चातुर्याने वापर केला;
- सामान्य रयतेची व्यवस्था, शेतकर्‍यांची व्यवस्था, लढवय्या शूर सरदारांची व्यवस्था, धार्मिक स्थानांची व्यवस्था... अशा अनेक व्यवस्था लावून दिल्या.
- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली;
- राजभाषा (मराठी) विकसित करण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न केला; विविध कलांना राजाश्रय दिला.
- तसेच खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला.

या सर्व गोष्टी त्यांनी साध्य केल्या अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात!

सतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान, ती स्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते. महाराष्ट्र धर्म वाढवण्याची स्फूर्ती देते. Read the full story